मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयानंतर स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी संतप्त झाले असून ठिकठिकाणी आंदोलने करत आहेत. यावर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. आयोगाचा निर्णय एकटा सचिव किंवा सहसचिव घेत नाहीत. शासनाने आम्हाला (MPSC) काल एक लेखी पत्र पाठवल त्यावर आम्ही शासनाने पाठवलेल्या लेखी पत्राची अंमलबजावणी करत हे आजचं परिपत्रक काढलं आहे. हा निर्णय आपत्ती निवारण विभागाने दिला असून याला मुख्यमंत्री यांनी परवानगी दिली आहे. त्यानंतर हा निर्णय लेखी पत्राद्वारे घेण्यात आला असल्याचे आयोगाने सांगितले आहे. दरम्यान, यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे स्वतः कोविड पॉझिटिव्ह असून ब्रिच कॅण्डी रुग्णालय मुंबई येथे उपचाराकरिता गेल्या पाच दिवसापासून भरती आहेत. पुणे येथे विधार्थ्यांचे आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी स्वतः व्हिडीओव्दारे माहिती दिली.


राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोविडची पार्श्वभूमी लक्ष्यात घेता राज्य सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेताला आहे. या राज्याचा मंत्री जरी असलो तरी कष्टकरी, कामगार, मध्यमवर्गीय यांची मुले मोठ्या प्रमाणात परीक्षा देत असल्याने त्यांचे आईवडील घाम गाळून मुलांना अधिकारी होण्याचे स्वप्न बघत आहे, त्यामुळे मी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विनंती करून यावर तोडगा काढून मार्ग काढावा, विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्या, तसेच विरोधी पक्षांनी यावर तेल घालून राजकारण करू नये, आपल्या सर्वांच्या मुलांच्या भविष्याचा विषय आहे, यावर सर्वजण मिळून तोडगा काढूया, अशी कळकळीची विनंती केली आहे.


रद्द केलेली पूर्वपरीक्षा घेण्याबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरु : सूत्र
कोरोनामुळं एमपीएससीची 14 मार्च रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षा पुढे ढकलण्याच्या MPSC च्या निर्णयामुळे सरकारविरोधात रोष निर्माण झालं आहे. पुण्यातील नवी पेठेत शेकडो विद्यार्थ्यांचा रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केलं आहे. MPSC ने सरकारशी चर्चा न करता परस्पर निर्णय घेतल्याचे समोर आलं आहे. या सगळ्या प्रकारानंतर रद्द केलेली पूर्वपरीक्षा घेण्याबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरु झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत.



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलली
राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याववर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं आयोगाने म्हटलं आहे. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI