हितेंद्र ठाकूर आणि उद्धव ठाकरे यांची जुगलबंदींही उपस्थितांना पाहायला मिळाली. यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी उद्धव ठाकरे यांच्या कानात काहीतरी सांगितलं. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी मिळून भाजपला अडचणीत आणणार का? असा प्रश्न आता उमेदवारांना पडू लागला आहे.
होय आम्ही कुत्रे आहोत : हितेंद्र ठाकूर
हितेंद्र ठाकूर यांनी मात्र उद्धव आणि आपली भेट ही केवळ योगायोग असल्याचं सांगितलं. यावेळी आपली सीट येणारच असं उद्धव यांच्या कानात सांगून निवडणुकीत मदत मागितल्याची कबुलीही ठाकूरांनी दिली. मात्र उद्धव ठाकरेंनी आम्ही शिटी घेतो, तुम्ही भगवा खांद्यावर घ्या, अशी मिश्कीली जोडल्याचंही हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं.
पालघर पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांना शिवसेना-भाजपपेक्षा 'शिटी'ची सीट आल्याचं चालेल. शिवसेनेला भाजपची सीट आलेली चालणार नाही आणि भाजपला शिवसेनेची सीट आलेली चालणार नाही. त्यामुळे सर्व पक्षाचे कार्यकर्ते, नेते आमच्या पक्षाच्या उमेदवाराला मदत करणार असल्याचा दावाही ठाकूरांनी केला.
इलाका तो कुत्तों का होता है, शेर का नाही, मुख्यमंत्र्यांचा ठाकूरांवर हल्ला
कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकण्याच्या इराद्याने शिवसेना आणि भाजपची वरिष्ठ नेते मंडळी पालघरमध्ये ठाण मांडून आहेत. सर्व पक्ष वसई-विरारमध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांना टार्गेट करताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात हितेंद्र ठाकूरांना कुत्रा-मांजर संबोधून टीका केली होती. त्यावर ठाकूरांनी उत्तर दिलं.
'सध्या पालघरमध्ये पातळी सोडून प्रचार सुरु आहे. होय आम्ही कुत्रे आहोत. तीस वर्षांपासून वफादार कुत्र्यासारखं लोकांबरोबर, मतदारांबरोबर आम्ही इमानदार आहोत' असं प्रत्युत्तर हितेंद्र ठाकूर यांना कुत्रे-मांजर संबोधल्यानंतर त्यांनी शिवसेना आणि भाजपला दिलं.