मुंबई: मुंबईची लाईफ-लाईन अर्थात लोकल रेल्वे म्हणजे नेहमीच खचाखच गर्दी, जागेसाठी गडबड, भांडण आणि राडा हे ठरलेलं चित्र. पण याच गर्दीच्या लोकलमध्ये काही आश्चर्यकारक, काही अभिमानास्पद आणि काही कौतुकास्पद घटनाही घडतात.

मग ते नेहमीच एकाच डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या सहकाऱ्यांनी सणवाराला लोकल सजवणं असो किंवा अन्य काही, अशा चांगल्या घटना लोकल रेल्वेत घडत असतात.

याच लोकलमध्ये बेफाम होऊन डान्स करणाऱ्या एक तरुणाने, आपल्या सहप्रवाशांनाही ठेका धरायला लावला. झिंगाट गाण्यावर भन्नाट डान्स करणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ मुंबई मेरी जान या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आला आहे.

रात्रीच्या वेळी हा व्हिडीओ शूट केल्याचं दिसतंय. कामावरुन घराकडे निघालेले थकलेले प्रवाशी या लोकलमध्ये बसलेले दिसतात. मात्र या तरुणाने जबरा डान्स करुन, थकलेल्या चेहऱ्यांवरही हसू फुलवलं आणि दिवसभरातील थकवा अवघ्या 2 मिनिटात कुठल्या कुठे पळवला.

पाहा व्हिडीओ 

https://twitter.com/Mumbaikhabar9/status/875080822767980544