मुंबई : पश्चिम रेल्वेच्या दोन अभियंत्यांना लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयनं अटक केली आहे. पाच लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयनं ही कारवाई केली आहे.


मुंबईतील महालक्ष्मीच्या इएमयू वर्कशॉपच्या दोन सिनीयर सेक्शन इंजिनिअरना लाच मागणे आणि स्वीकारणे या आरोपांखाली सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. या दोन्ही सेक्शन इंजिनियरनी परिक्षेसाठी पाच लाखांची लाच मागितली होती. तसंच ही रक्कम चेकद्वारे देण्याची मागणी केली होती.

या दोन्ही अधिकाऱ्यांनी विभागाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी पाच लाखांची लाच मागितल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांना विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आलं. यावेळी त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.