मुंबई : रेल्वेनंतर बेस्ट ही मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन आहे. गेल्या सात दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बेस्ट संपावरुन चर्चा, बैठकांची सत्र सुरु आहेत. परंतु आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या बेस्टची पूर्णत: जबाबदारी घ्यायला महापालिका आणि राज्यसरकार दोघेही सध्या तयार नाहीत.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आढावा
7 जानेवारी : मध्य रात्रीपासून संप सुरू झाला
8 जानेवारी : पालिका आयुक्त आणि युनियन नेते यांच्यात बैठक झाली, तोडगा नाही
8 जानेवारी : संध्याकाळी पुन्हा आयुक्त आणि शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेत बैठक झाली यावेळी सेनेच्या युनियनने संपातून माघार घेतली
9 जानेवारी : बेस्ट महाव्यवस्थापक आणि बेस्ट कामगार कृती समिती यांच्यात दोन बैठका झाल्या तोडगा नाही
10 जानेवारी : बेस्ट महाव्यवस्थापक आणि बेस्ट कामगार कृती समितीत पाच तास बैठक झाली.
10 जानेवारी : संध्याकाळी महापौर बंगल्यावर उद्धव ठाकरे, महापालिका आयुक्त, बेस्ट महाव्यवस्थापक, बेस्ट कामगार संघटना यांच्यात 7 तास बैठक झाली. चर्चा निष्फळ
11 जानेवारी : न्यायालयाने संपावर तोडगा काढण्यासाठी त्रिसदस्यियसमिती तयार करुन चर्चा करुन तोडगा काढण्यास सांगितले.
12 जानेवारी : मंत्रालयात राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीच्या बेस्ट कामगार कृती समिती सोबत बैठक झाली.
13 जानेवारी : संपाबाबत कोणतीच चर्चा नाही, तोडगा नाही
14 जानेवारी : बेस्ट संपाबाबत मंत्रालयात पुन्हा एकदा त्रिसदस्यीय उच्च समिती आणि बेस्ट कामगार कृती समितीत बैठक झाली.
14 जानेवारी : मनसेने संप प्रश्नात उडी मारली, शिवसेना बेस्टपेक्षा कोस्टल रोडला प्राधान्य देते म्हणून, मुंबईतले कोस्टल रोडचे काम बंद पाडले. मनसे कार्यकर्त्यांनी मेट्रो 3 चे काम थांबवले
14 जानेवारी : न्यायालयासमोर त्रिसदसदस्यीय समिती गेली. कोर्टाने बेस्ट संघटनांना संप मागे घेण्यास सांगितले. बेस्ट संघटनांना फटकारले, मात्र उद्या पुन्हा सुनावणी होणार. बेस्ट संप अद्याप सुरु आहे.
संबधित बातम्या
बेस्ट संप : जनतेला वेठीस धरणं चुकीचं, हायकोर्टाने खडसावलं
बेस्ट संपात मनसेची उडी, कोस्टल रोड आणि मेट्रो 3 विरोधात आंदोलन
बेस्ट संप : आठवडाभरात काय काय झालं?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jan 2019 08:51 PM (IST)
रेल्वेनंतर बेस्ट ही मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन आहे. गेल्या सात दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बेस्ट संपावरुन चर्चा, बैठकांची सत्र सुरु आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -