Mumbai Crime : कुर्ला डेपोमध्ये सुरू असलेल्या विकासकामांसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एक 7 वर्ष वयाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. उज्ज्वल रवी सिंग असे या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून तो बाजूच्या वत्सला ताई नाईक नगर या विभागात राहत होता.
अधिकची माहिती अशी की, उज्ज्वल रवी सिंग आज दुपारी त्याच्या मित्रांसह कुर्ला डेपोच्या आत खुल्या जागेत खेळण्यास आला होता. या वेळी इथे इमारतीच्या निर्मितीसाठी खोदण्यात आलेल्या आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यात तो पडला. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. त्यानंतर तिथे असलेल्या काही वाहन चालकांनी त्याला खड्ड्यात उतरून बाहेर काढले आणि उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच नेहरू नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या बाबत अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
मुलाच्या मृत्यूनंतर आईने टाहो फोडला, म्हणाली; न्याय मिळायला हवा
मुलाची आई म्हणाली, माझा मुलगा खेळायला गेला होता. तिथून तो परत आलाच नाही. मला म्हटला तू जा मी इथे खेळतो. त्यानंतर त्याने मला कळशी भरुन पाणीही दिले होते. त्यानंतर तो गेला आणि गेलेला परत काही वापस आलेला नाही. डेपोमध्ये माझा मुलगा गेला हे मला माहितीच नाही. मला वाटलं तो आसपास खेळतोय, त्यामुळे मी आतमध्ये काम करत होते. नंतर मला पोलिसांकडून फोन वगैरे आला. पोलिस मला राजेवाडीला घेऊन गेले. डेपो वाल्यांवर कारवाई करा. माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. मी गरीब आहे. माझा नवराही आज जगात नाही.
वाशिममध्ये दुभाजक तोडून कारची दुसऱ्या गाडीला धडक, 7 जण गंभीर जखमी
दरम्यान, वाशिम- रिसोड मार्गावर मध्य रात्री सवड गावाजवळ एक विचित्र अपघात झाल्याची घटना घडली. भरधाव कार दुभाजक तोडून दुसऱ्या कारवर आदळल्याने 7 गंभीररित्या जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही कारमधील लोक या अपघातात जखमी झाले आहेत. .. रिसोडकडून वाशिमकडे येणाऱ्या आणि वाशिमकडून रिसोडकडे जाणाऱ्या एका कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात झाला. दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारवर धडकून विचित्र अपघात झाला. यामध्ये 7 जण जखमी झाले... दोन्ही कारचं मोठं नुकसान झाल असून सर्व जखमींना रात्रीच उपचारासाठी वाशिम इथं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या