नवी मुंबई: नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन आज सकाळी कामोठे इथे फुटली. यामुळे पाण्याचे फवारे 10 ते 15 फूट उंच उडत होते. पाईप लाईनच्या बाजूला जेसीबी मशीनद्वारे काम चालू होते. मात्र त्याचवेळी जेसीबी लागल्यामुळे पाईप फुटली  आणि पाण्याचे फवारे उडू लागले. मोरबे धरणातून येणारी ही पाईप लाईन आहे. https://twitter.com/abpmajhatv/status/911485449939513344