मुंबई: महागाईविरोधात शिवसेनेने आज आंदोलन सुरु केलं आहे.  मुंबईतल्या वेगवेगळ्या 12 ठिकाणी हे आंदोलन होत आहे.  पेट्रोल दरवाढीचा भडका उडाला असताना दिवसेंदिवस होत असलेल्या महागाईला सेनेनं विरोध दर्शवला आहे.


दुर्देवानं ही पाळी आमच्यावर आली असून सत्तेत असलो, तरी सत्तेची चावी ज्यांच्या हातात आहे, त्यांनी ही भाववाढ केल्याचं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

"नरेंद्र सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय", अशा घोषणा देत शिवसैनिकांनी सरकारचा निषेध केला.  मात्र कहर म्हणजे सत्तेत असलेल्या शिवसेनेने 'एवढी माणसं कशाला, मोदींच्या मयताला'अशा घोषणा देत टोक गाठलं.

https://twitter.com/abpmajhatv/status/911495417044414466

सीएसटी परिसरात खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत यांच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरु आहे. त्यावेळी या घोषणा ऐकायला मिळाल्या. यावेळी शिवसेनेने महागाईचा प्रतिकात्मक राक्षसही आणला होता. आंदोलनावेळी अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं.



शिवसेनेच्या मोर्चावर प्रतिक्रिया

भाजप आमदार आशिष शेलार यांची प्रतिक्रिया - 

https://twitter.com/ShelarAshish/status/911499927100018688

https://twitter.com/ShelarAshish/status/911500089746771968

भाजप खासदार किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

https://twitter.com/abpmajhatv/status/911497056140722176

शिवसेनेचं आंदोलन

देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले. भाजीपाला महागला, जीवनावश्यक वस्तूंचे दर आवाक्याबाहेर गेल्यामुळे सामान्यांना जगणे कठीण झाले आहे. त्याला कारणीभूत असलेल्या केंद्र सरकारबद्दल देशभरात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे महागाईचा तीव्र निषेध करत आहोत, असं म्हणत शिवसेनेने आंदोलनाची हाक दिली.

१) वांद्रे, कलानगर येथील म्हाडा कार्यालय

वांद्रे-कलानगर येथील म्हाडा कार्यालयाजवळ विभागप्रमुख- आमदार अॅड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन. मोर्चात महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, आमदार तृप्ती सावंत, रमेश लटके, विभाग संघटक रजनी मेस्त्री, राजुल पटेल आणि सर्व नगरसेवक, शाखाप्रमुख,पदाधिकारी तसेच शिवसैनिकांचा समावेश.

२) नॅशनल पार्क ते बोरिवली

प्रभाग क्रमांक १ च्या वतीने शिवसेनेचे मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा. या मोर्चात किभागप्रमुख प्रकाश कारकर, प्रभारी किभागप्रमुख किलास पोतनीस, महिला किभाग संघटक रश्मी भोसले यांच्यासह शिवसैनिक सहभागी होणार आहेत.

३) जोगेश्वरी रेल्वे स्थानक

विभाग क्रमांक ३ मध्ये विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी आणि शिवसैनिकांसह जोगेश्वरी स्थानक पूर्व येथे महागाईविरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत.

४) कुर्ला नेहरूनगर

विभाग क्रमांक ५ च्या वतीने आमदार मंगेश कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली कुर्ला पूर्व नेहरूनगर येथील अभ्युदय बँकेजवळ आंदोलन करण्यात येणार आहे.

5) घाटकोपर-अंधेरी लिंक रोड

ईशान्य मुंबई विभाग क्रमांक ८ च्या वतीने विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर श्रेयस सिग्नलपासून पुढे घाटकोपर पश्चिम येथे मोर्चा काढण्यात येणार आहे.

6) कांदिवली पूर्व ते पश्चिम

शाखा क्रमांक २१ च्या वतीने विभागप्रमुख कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली (पूर्व) ते सरोवर हॉटेल, कांदिवली (पश्चिम) असा मोर्चा काढण्यात येणार आहे.

7) दादर रेल्वे स्थानक

विभागप्रमुख-आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दादर रेल्वे स्थानकासमोर सुविधा येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.

8) भांडुप पश्चिम

विभागप्रमुख दत्ता दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिरोमणी चौक, एलबीएस मार्ग ते कमल हॉटेलसमोर, भांडुप (पश्चिम) या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे.

9) चेंबूर नाका

विभागप्रमुख-नगरसेवक मंगेश सातमकर यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर नाका येथे रास्ता रोको आणि आंदोलन करण्यात येणार आहे.

10) करी रोड, लोअर परेल रेल्वे स्थानक

विभागप्रमुख-नगरसेवक आशीष चेंबूरकर यांच्या नेतृत्वाखाली करीरोड (पश्चिम) आणि लोअर परळ स्थानक या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल.

१1) दक्षिण मुंबई

विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महापालिका मुख्यलय यांच्या मधील चौकात. आंदोलन करणार आहेत. तसेच मोर्चेही काढले जाणार आहेत.