नवी मुंबईः मध्य रेल्वेच्या व्यवस्थापनाचे वाभाडे काढणारं उदाहरण हार्बर मार्गावरील खांदेश्वर स्टेशनवर समोर आलं आहे. पावासाळा सुरु झाल्यापासून स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.


 

व्यवस्थापनाकडून पाणी उपसा नियमित केला जातो. मात्र रात्री पाऊस झाल्यास पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबतं. पहाटे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसतो. खांदेश्वर स्टेशनमध्ये आज पहाटे 5 ते 7 फुट पाणी तुंबलं होतं. यावर रेल्वेकडून काही तरी कायमस्वरुपी उपाय करणं गरजेचं आहे.

 

फोटो वेळः पहाटे 5.30 वाजता

पावासाळा सुरु झाल्यापासून स्टेशनवर पाणी तुंबत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. पहिल्या पावसानंतर स्टेशनच्या इमारतीमध्ये पाणीच पाणी झालं. त्यानंतर इंजिनद्वारे पाणी उपसा सुरु केला. मात्र रात्री जास्त पाऊस झाल्यास सकाळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होतात. अजून किती दिवस असा पाण्यातून मार्ग काढायचा, असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.