मुंबई : नियम पायदळी तुडवणाऱ्या गोविंदा पथकांचा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना फारच पुळका आला आहे. गोविंदा पथकांवर लावलेले सदोष मनुष्यवधाचे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अॅडव्होकेट जनरल यांचं मत जाणून घ्यावं, अशी विनंतीही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यांसदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यां
सुप्रीम कोर्टाच्या आदेश पायदळी तुडवत, दहीहंडीत 20 फुटांपेक्षा जास्त उंचीचे थर आणि 18 वर्षांखालील गोविंदांचा समावेश केल्याने काही गोविंदा पथकांवर भारतीय दंडसंहिता कलम 308 हे सदोष मनुष्यवधाचं कलम लावण्यात आलं आहे. यामध्ये मुंबईत 29 मंडळावर तर ठाण्यात 20 मंडळावर गुन्हे दाखल झाले आहेत.
न्यायालयाचा मान सर्वांनी राखायलाच हवा. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी पोलिसांच्या कारवाईबाबत भाजप कोणतंही भाष्य करणार नाही. परंतु अशी गंभीर स्वरुपाची कलमं तरुण वयात दाखल झाल्यास या गोविंदाच्या पुढील आयुष्यावर विपरित परिणाम होतील, अशी भीती आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.
मात्र अल्पवयीन मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायाला लावणं कितीपत योग्य, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.