मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 8 दिवस पाणीकपात!
एबीपी माझा वेब टीम | 19 Aug 2016 05:52 AM (IST)
मुंबई: मुंबईकरांना पुढील आठ दिवस पाणी कपातीची झळ सोसावी लागणार आहे. मुंबईकरांच्या पाण्यात 20 टक्के कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी काटकसरीने वापरावं लागणार आहे. मुंबईतील गुंदवली ते कापूरबावडी भूमीगत जलबोगदा सुरु करण्यात येणार असल्याने, महापालिका प्रशासनाच्यावतीने तानसा, वैतरणा आणि उर्ध्व वैतरणा या जलवाहिन्यांवर काम करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत आठ दिवस 20 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान ही पाणीकपात होणार आहे. 22, 23, 26, 27, 28 30, 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी ही पाणीकपात होणार आहे. त्यामुळे आदल्या दिवशीच पाण्याचा साठा करून पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे.