मुंबई : धावती लोकल पकडण्याच्या नादात प्लॅटफॉर्मवर फरफटत जाणारी महिला थोडक्यात बचावली आहे. विरारमध्ये शुक्रवारी रात्री ही घटना घडली.


बोरीवलीला राहणारी ही महिला शुक्रवारी मुलीला घेऊन जात होती. रात्री 9.15 च्या सुमारास विरार स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 3 वरुन धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात होती.

तिची मुलगी ट्रेनमध्ये चढली, पण चढताना तोल जाऊन महिला पडली आणि फरफटत पुढे गेली.

मात्र रेल्वेचे पोलिस उपनिरीक्षक गोपालकृष्णन राय यांनी हा प्रकार पाहिला आणि धावत जाऊन त्या महिलेला बाहेर काढलं. त्यामुळे ही महिला थोडक्यात बचावली. काही सेकंद उशिर झाला असता तर प्लॅटफार्म आणि ट्रेनच्या फुटबोर्डमध्ये सापडून तिचा जीवही गेला असता.

पाहा व्हिडीओ