अनधिकृत बिल्डर्ससोबत डान्स, विरार पालिकेचे 9 इंजिनिअर निलंबित
एबीपी माझा वेब टीम | 05 Feb 2017 03:32 PM (IST)
विरार : वसई विरारमध्ये महापालिकेची प्रतिमा मलीन करणारा प्रकार घडल्याचं वृत्त आहे. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डर्ससोबत चक्क पालिकेच्या इंजिनिअर्सनी दारु पिऊन डान्स केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. डान्स करणाऱ्या 9 इंजिनिअर्स आणि एका कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. रविवार असूनही पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी या प्रकरणी कारवाई केली आहे. स्वरुप खानोलकर नावाच्या पालिकेतील इंजिनिअरची बर्थडे पार्टी होती. 24 जानेवारीला विरारच्या एका रिसॉर्टमध्ये या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्टी जरी खाजगी असली, तरी हा प्रकार अशोभनीय असल्याचं म्हटलं जातं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे पालिकेची प्रतिमा मलीन झाल्याचं म्हटलं जातं. व्हिडीओ :