विरारमध्ये क्रिकेटपटू तरुणाने आईसह आयुष्य संपवलं
एबीपी माझा वेब टीम | 11 May 2019 02:12 PM (IST)
विनय हा उत्तम क्रिकेटपटू होता. विरारच्या "साईबा" या क्रिकेट संघाकडून खेळत होता. अष्टपैलू विनय अनेक पारितोषिकं मिळवली होती.
विरार : विरारमध्ये एका अष्टपैलू क्रिकेटपटने आईसह राहत्या घरी आत्महत्या केली. या मायलेकाने विषारी औषध पिऊन आपलं आयुष्य संपवलं. विनय प्रकाश चौगुले उर्फ दादू असं 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे तर सरस्वती प्रकाश चौगुले असं 42 वर्षीय आईचं नाव आहे. हे दोघे नारंगी येथील साई हेरिटेज या इमारतीत भाड्याने राहत होते. या दोघांचे मृतदेह काल रात्री सव्वा आठच्या सुमारास घरात आढळून आले. विरार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन, मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन आत्महत्येच्या कारणाचा तापस सुरु केला आहे. आर्थिक उधारीमुळे आत्महत्या? प्राथमिक माहितीनुसार विनयचे वडील हयात नाही. तो आई बरोबरच राहायचा आणि खाजगी नोकरी करत होता. मात्र त्यांना नेहमीच आर्थिक चणचण भासायची. आर्थिक उधारीही होती. त्यामधून मायलेकाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अष्टपैलू क्रिकेटपटूच्या मृत्यूने हळहळ विनय हा उत्तम क्रिकेटपटू होता. विरारच्या "साईबा" या क्रिकेट संघाकडून खेळत होता. अष्टपैलू विनय अनेक पारितोषिकं मिळवली होती. त्यामुळे त्याच्या जाण्याने विरारमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.