Virar Blast News : विरारमध्ये (Virar) एका चायनीज दुकानात ब्लास्ट झाल्याची घटना घडली आहे. या ब्लास्टची तीव्रता एवढी मोठी होती की, दुकानाचे शटर, आतील सामान, सर्व तुटून पडले आहे. या घटनेत रस्त्यानं जाणारा एक पादचारी गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर सध्या उपचार सुरु आहेत. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा ब्लास्ट झाला आहे. पण नेमका ब्लास्ट कशाचा झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
विरार पूर्व मनवेलपाडा रोडवरील सिग्नल वरील कॉर्नरवर असलेल्या चायनीज दुकानात हा ब्लास्ट झाल्याची घटना घडली. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दुकानातील सर्व गॅस सिलेंडर, एसी कॉम्प्रेशर, फ्रीज हे सर्व सुरक्षित आहे. पण नेमका ब्लास्ट कशाचा झाला हे मात्र स्पष्ट झाले नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वसई विरार महापालिका अग्निशामक दलाचे जवान घठनास्थळी दाखल झाले. तसेच विरार पोलिसांनी देकील घटनास्थळावर येऊन पाहणी केली आहे. मात्र, ब्लास्टचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अचानक झालेल्या ब्लास्टमुळं आजूबाजूच्या सोसायटीमधील राहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. हा ब्लास्ट नेमका कशाचा याचा पोलीस तपास करीत आहेत.
स्फोटाचं रहस्य वाढलं
रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारा चायनीजच्या दुकानातून प्रचंड मोठा आवाज झाला. या आवाजानं मनवेल पाडा परिसर हादरुन गेला होता. दरम्यान, स्फोटासारखा आवाज झाल्यानं परिसरात भीती पसरली. या घटनेत एक जण जखमीही झाला आहे. तसेच चायनीजच्या दुकानातील सामानालाही स्फोट सदृश्य आवाजानं फटका बसला. दुकानातीन बहुतांश सामानाचं नुकसान झालं आहे. मात्र, या स्फोटाचं कारण कळू न शकल्यानं या स्फोटाचं रहस्य वाढलं आहे. असे घातक स्फोट सिलिंडिरमुळे किंवा एसी कॉम्प्रेशरचा स्फोटमुळे होतात. तसाच हा स्फोट झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र दुकानात पाहिल्यानंतर सिलिंडर आणि एसी कॉम्प्रेशन, इतकंच काय तर फ्रीजही सुरक्षित होता. त्यामुळं स्फोटाचा आवाज कशामुळे झाला, यावरुन चर्चांना उधाण आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: