VIDEO: या हुल्लडबाजांना शोधा, लोकलमध्ये दुसऱ्यांच्या जीवावर बेतणारे स्टंट
एबीपी माझा वेब टीम | 01 Aug 2018 10:52 AM (IST)
रविवारी दुपारी चार टवाळखोरांनी जीटीबी ते सीएसएमटी दरम्यानच्या प्रवासादरम्यान जीवघेणी स्टंटबाजी केली.
मुंबई: लोकल ट्रेनमधील टवाळखोरांची स्टंटबाजी नवी नाही. त्यातल्या त्यात हार्बर रेल्वे मार्गावर तर अशा टवाळखोरांची सुळसुळाट आहे. अशाच टवाळखोरांची स्टंटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. रविवारी दुपारी चार टवाळखोरांनी जीटीबी ते सीएसएमटी प्रवासादरम्यान जीवघेणी स्टंटबाजी केली. इतकंच नाही तर या उनाडटप्पूंनी ट्रेन सुरु असताना, प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या प्रवाशाचा मोबाईलही हिसकावला. हे चार हुल्लडबाज कोण होते, हे अद्याप समोर आलं नाही. मात्र अशा हुल्लडबाजांमुळे इतरांना जास्त त्रास होतो. नुकतंच अशा टपोऱ्यांनी चालत्या ट्रेनमधून लाथ मारल्यामुळे रेल्वे रुळांची देखभाल करणाऱ्या ट्रॅक टेक्निशियनला जीव गमवावा लागला होता. मुंबईतील पश्चिम रेल्वेवर महालक्ष्मी आणि लोअर परेल स्थानकादरम्यान 25 जुलैला सकाळी हा दुर्दैवी प्रकार घडला होता. त्यामुळे अशा स्टंटबाजांवर आळा घालायला हवा. कारण हे स्वत:ची तर माती करुन घेतातच, पण त्यांच्यामुळे अन्य निष्पापांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे या व्हिडीओत दिसणारे हुल्लडबाज कुठे दिसतील, तर पोलिसांना कळवा. VIDEO: संबंधित बातम्या प्रवाशाने लाथ मारल्याने डोकं आपटून ट्रॅक टेक्निशियनचा मृत्यू 'बाहुबली'तील स्टंटबाजी भोवली, हत्तीच्या टक्करने तरुण बेशुद्ध वसई: या स्टंटबाजांना आवर घाला मुंबई लोकलमध्ये स्टंटबाजी, कळवा खाडीत पडून तरुणाचा मृत्यू स्पेशल रिपोर्ट : स्टंट व्हिडिओच्या नादापायी 12 वर्षांच्या मुलांचा मृत्यू स्टंटबाजी जीवावर बेतली, मुंबईत बाईक पेटून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू