सणासुदीच्या दिवसात मुंबईत साथीचा ताप, डेंग्यू, मलेरियाची लागण
एबीपी माझा वेब टीम | 16 Sep 2016 03:53 PM (IST)
मुंबई : सणासुदीच्या दिवसात मुंबईत साथीच्या तापाने नागरिक आजारी पडू लागले आहेत. डेंग्यू, मलेरिया आणि व्हायरल फिव्हरमुळे जवळपास 5 हजारपेक्षा जास्त रुग्ण रुग्णालयात दाखल आहे. 5 हजारपेक्षा अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल असल्याची आकडेवारी 1 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यानची आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकासुद्धा चांगलीच कामाला लागली आहे. आकडेवारी : आजार रुग्ण ताप 4607 मलेरिया 315 लेप्टो 9 गस्ट्रो। 249 कावीळ 63