मुंबई : शासकीय अधिकाऱ्यांनी मनापासून काम केलं तर गावांचा विकास व्हायला वेळ लागणार नाही, असे स्पष्ट मत पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी मांडले. गावाचा विकास करण्यासाठी निधीची फार आवशक्यता आहे. त्यामुळे गावातचं निधी उभा करायसा हवा, असे सांगत पाटोदा गावच्या अभिनव करसंकलनाचे उदाहरण त्यांनी मांडले. शहरे नक्कीच मोठी व्हावीत, पण प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. आज आपण शहरातून बाहेर पडणाऱ्या लोंढ्यावरुन अंदाज लावू शकतो की शहरांवर किती मोठ्या प्रमाणात ताण आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव पाटोद्याचे सरपंच भास्कर पेरे पाटील आज माझा कट्टा कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर आपलं मत मांडलं.


कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे आज प्रत्येकजण आपल्या गावाचा रस्ता धरतो आहे. मात्र, अनेक गावांनी अशा लोकांना आपले रस्ते बंद केले आहे. असं करणे चुकीचे आहे. कारण, गाव त्यांचंही आहे. गावात त्यांचं घर, शेती आहे. त्यामुळे गावावर त्यांचाही अधिकार आहे. परंतु, गावात येणाऱ्या प्रत्येकाने आपली तपासणी करुन घ्यावी. 14 दिवस स्वतःला क्वॉरंटाईन करुन घ्यावे, असे मत भास्कर पेरे पाटील यांनी मांडले. जो बदल समाजात घडावा असं आपल्याला वाटतं तो बदल आधी स्वत:त घडवा. त्या बदलाचे काय फायदे होतात ते लोकांना-समाजाला दिसूद्यात, समाज आपोआप तुमच्या मागे येईल, असं सुत्र पाटोदा बदलणाऱ्या आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचं आहे.


झोन निश्चित करण्याचं स्वातंत्र्य राज्य सरकारांना मिळावं; चौथ्या लॉकडाऊनआधी राज्याची केंद्राकडे मागणी


पाटोदा पटर्न
औरंगाबाद शहरापासून वीस एक किलोमीटरवर असलेले हे पाटोदा गांव. या गावात ग्रामपंचायत कराचा शंभर टक्के भरणा होतो. ग्रामपंचायत कराची रक्कम फक्त धनादेशाद्वारेच स्वीकारली जाते, म्हणजेच गावात घरटी किमान एक बँक खाते आहे. साडेतीन हजाराच्या आसपास या गावची लोकसंख्या आहे. करियर गायडन्स, जीवनविषयक प्रबोधन, शासकीय योजनांची माहिती, धार्मिक प्रवचनं-राष्ट्रीय कीर्तनं अशा पद्धतीने लोकप्रबोधनही केले जाते. गावात खासगी आणि सार्वजनिक वापरासाठी शौचालये आहेत. तीअखंड 24 तास, 365 दिवस पाणीपुरवठा होतो. तो पण शुद्ध पिण्याचे पाणी आणि सोलारमधून गरम पाणी. पण, या सुविधेसाठी गांव पैसे मोजतं. दररोजच्या घरगुती वापराच्या पाण्यासाठी गावात मीटर बसवले आहेत.


संरक्षण उत्पादन क्षेत्रातील एफडीआय मर्यादा 49 टक्क्यांवरून 74 टक्के : अर्थमंत्री निर्मला सीतारमण


टॅक्सच्या बदल्यात सुविधा
अभिनय उपायांनी पाटोदामध्ये कर संकलनात वाढ केल्याचे संरपंचांनी सांगितले. या कराच्या बदल्यात गावकऱ्यांना वेगवेगळ्या सुविधा देणअयात येतात. सध्या ग्रामपंचायततर्फे महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स दिले जाते. सोबतचं महिलांना वर्षभर मोफत दळून देण्याची सोय करण्यात आली आहे. फायदा दिसल्यास लोकांचा त्याला पाठिंबा मिळत असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. लहानपणापासून वाचण, फिरण्याची आवड असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत पेरे पाटील यांनी 22 देशांचा प्रवास केला आहे.