मुंबई :   प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा साखरपुड्यानिमित्त पार्टीचं आयोजन करण्यात आलं. या पार्टीत विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. पार्टीचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओत मुकेश अंबानी मुलगी ईशा अंबानी हिला मिठी मारत भावूक झालेले दिसत आहेत.

साखरपुड्यातील या व्हिडीओत गायक शंकर महादेवन आणि हर्षदीप कौर 'राजी' सिनेमातील 'दिलबरो...' गाणं गाताना दिसत आहेत. याच गाण्यावर डान्स करताना मुकेश अंबानी आणि ईशा अंबानी भावूक झाले.


यावेळी संपूर्ण अंबानी कुटुंबीय एकत्र दिसले. या पार्टीतील काही फोटोदेखील समोर आले आहेत. या फोटोमध्ये मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, अनंत अंबानी, ईशा अंबानी, श्लोका मेहता एकत्र  दिसत आहेत.

आकाश अंबानी आणि श्लोक मेहता यांच्या साखरपुड्याला रतन टाटा, सचिन तेंडुलकर, रेखा, आमिर खान, रणबीर कपूर, राजकुमार हिरानी, करण जोहर, काजोल या दिग्गजांनी हजेरी लावली.