- अहमदाबादहून ठाणे, मुंबईकडे येणारी जड-अवजड वाहने मनोर-वाडा-भिवंडी-ठाणे येथून येतील.
- विरारहून ठाणे, मुंबईकडे येणारी जड-अवजड वाहने शिरसाट फाटा-गणेशपुरी-वज्रेश्वरी अंबाडी-भिवंडी-ठाण्याहून येतील.
- वसई-विरार महानगरपालिका हद्दीतून जाणारी जड-अवजड वाहने चिंचोटी-कामण-अंजुर फाटा-भिवंडी-ठाणे येथून जातील.
- महसूल विभागाची वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पोलीस विभाग, तालुका दंडाधिकारी, तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सूरत यांनी परवानगी दिलेल्या वाहनांना यामधून सूट असणार आहे, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
वर्सोवा पूल आजपासून बंद, अवजड वाहने भिवंडीमार्गे वळवली
एबीपी माझा वेब टीम | 26 Nov 2018 08:24 AM (IST)
दुरुस्तीच्या कामांसाठी मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा खाडी पूल आजपासून बंद करण्यात येणार आहे.
मुंबई : दुरुस्तीच्या कामांसाठी मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा खाडी पूल आजपासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे गुजरातहून मुंबईकडे येणारी अवजड वाहतूक भिवंडीमार्गे वळवण्यात आली आहे. पुढील 1 महिना हा पूल बंद राहणार आहे. या कालावधीत इतर वाहनांसाठीही पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. दरम्यान दुरुस्तीच्या कालावधीत हलक्या वाहनांना एका मार्गिकेवरुन वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. वर्सोवा खाडी पूलाचे दुरुस्तीचे काम 26 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर 2018 या कालावधीत करण्यात येणार आहे. दुरुस्तीचे काम दोन टप्प्यात करण्यात केले जाईल. यासाठी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पहिली मार्गिका 15 दिवस बंद करण्यात येणार आहे. दुरुस्तीसाठीच्या पहिल्या 15 दिवसांच्या कालावधीत रस्त्यावरील एका मार्गिकेवरून हलक्या वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या मार्गिकेचे काम ही सुरु केले जाईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. पर्यायी मार्ग