नवी मुंबई : नवी मुंबईहून मुंबईला जोडणाऱ्या वाशी खाडी पुलाच्या दुरुस्तीच्या काम पूर्ण झालं असून पुलावरील दोन्ही मार्गिकेवरुन वाहतूकही सुरु करण्यात आली आहे.


4 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीत या पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरु होतं. अखेर आज या पुलाचं काम पूर्ण झालं असून आजपासून हा पूल वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. यावेळी वाशीकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर पुलाचे सांधे बदलण्यात आले आहेत. या कामासाठी 40 कुशल कामगार चेन्नईवरुन मुंबईत दाखल झाले होते. या कामगारांनी सलग अठरा दिवस काम करत हा पूल दुरुस्त केला.

दरम्यान, पुलाचं काम सुरु असताना वाहतुकीतही बदल करण्यात आले होते. तसेच अवजड वाहनांनाही या पुलावर बंदी घालण्यात आली होती. ती बंदी आता उठवण्यात आली असून वाहतूकही सुरळीत करण्यात आली आहे.