Vasai Virar Waterfall Drownin News : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगराज धुवांधार पाऊस कोसळत आहे. पावसाळ्यात अनेकजण फिरायला बाहेर पडतात. धबधब्याला सर्वाधिक पसंती दर्शवली जाते. पण उत्साहाच्या भरात अनेकदा दुर्घटना घडतात. अशीच एक दुर्घटना वसईत घडली असून बुडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वसईच्या चिंचोटी धबधब्यात तीन युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. काल गुरुवारी चिंचोटी धबधब्याचा आनंद घेण्यासाठी मुंबई आणि नालासोपारा येथून युवकांचा ग्रुप गेला होता. यात मुंबईच्या विलेपार्ले येथील राहणारा 18 वर्षीय सुमित राधेश्याम यादव या मुलाच मृत्यू झाला होता. तर काल गुरुवारी नालासापोरातील 18 वर्षीय रोशन राठोड आणि 19 वर्षीय रवी झा या दोन युवकांचा ही मृत्यू झाला होता. यां दोघांचा मृतदेह आज दुपारी चार वाजता मिळाला आहे. दोघे ही नालासोपारा अल्कापूरी येथील राहणारे आहेत. 


कालचा गुरुवार हा घात वार ठरला आहे. वसईच्या चिंचोटी धबधब्यात तीन युवाकांचा मृत्यू झाला आहे. मुंबई्च्या विलेपार्ले येथून चार मिञांसोबत मयत सुमित यादव हा चिंचोटी धबधब्यावर पोहण्यासाठी आला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने सुमित यादव हा त्यात बुडाला. काल राञी याचा मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक नागरीक, अग्निशमन दल विभाग आणि पोलिसांना यश आलं.  माञ गुरुवारी नालासोपारा येथून सहा मिञांचा ग्रुप ही चिंचोटी धबधब्यावर पोहण्यासाठी गेला होता. त्यात ही रोशन राठोड (वय 18) आणि रवी झा (वय 20) ही दोन युवक  यात बुडाले होते. माञ त्यांच मृतदेह काल मिळाला नाही.


 आज दुपारी दोनच्या सुमारास दोघां युवकांचा मृतदेह मिळाला. माञ भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष अभय काकड यांनी पालिकेच्या अग्निशमन दल आणि पोलिसांवर गंभीर आरोप करत, मृतदेह खाली आणण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी नव्हते. स्थानिक गावक-यांना सहा हजार दिल्यावर त्यांनी दोघांचे मृतदेह खाली आणल्याचा गंभीर आरोप केला आहे. नायगांव पोलिसांनी खबरदारी म्हणून धबधब्यावर कुणी जावू नये म्हणून पोलीस गस्त वाढवली आहे. मिरा भाईंदर,वसई विरार पोलीस आयुक्तालयामार्फत पावसाळ्यात धबधबे, धरण, आणि समुद्रकिनारी फिरण्यास मनाई आदेश आहे. असे असताना पर्यटक अशा ठिकाणी जात असतात.  धबधब्यावर जाताना पर्यटकांनी काळजी घ्यायला हवी.