PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. सीएसएमटी ते सोलापूर आणि  मुंबई ते शिर्डी दरम्यान या मार्गावर या दोन्ही वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले.


PM Modi : भाषणात पंतप्रधान मोदी काय म्हणाले ?


पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे, देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) समर्पित करताना मला खूप आनंद होत आहे. आजचा दिवस भारतीय रेल्वे आणि मुंबईच्या कनेक्टिव्हिटीसाठी मोठा दिवस आहे, असे मोदी यावेळी मराठीतून बोलले. त्यानंतर त्यांनी आपले भाषण हिंदीतून केले.  


1. या दोन्ही वंदे भारत ट्रेन मुंबई आणि पुणे या देशातील मोठ्या शहरांना जोडणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांना चालना मिळेल.  


2. देशातील 17 राज्यांतील 108 जिल्हे वंदे भारत एक्स्प्रेसने जोडले आहेत.


3. देशात आज नवीन विमानतळ, वंदे भारत एक्सप्रेस आणि मेट्रोचं जाळं वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.


4. पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात दहा लाख कोटी रूपयांची तरतूद केली आहे. पायाभूत सुविधांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. 


5. पायाभूत सुविधांमुळे नवीन उद्योगांना चालना मिळेल. 


6. मोठ्या गतीनं देशात वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. 


7. डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा विकास होत आहे.


8. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार विकासाच्या मार्गावर चालत आहे.  


कुठून कुठेपर्यंत? 


दोन्ही नवीन गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुरू होतील. एक गाडी मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर धावेल. दुसरी मुंबई-नाशिक-साई नगर शिर्डी मार्गावर धावेल.


वंदे भारत एक्सप्रेस तिकीट दर किती ?


मुंबई ते पुणे चेअर कारसाठी 560 रुपये ते एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1135 रुपये, मुंबई ते सोलापूर चेअर कारसाठी 965 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1970 रुपये, मुंबई ते नाशिकसाठी चेअर कार 550 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1150 रुपये, मुंबई ते शिर्डी चेअर कार 800 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्ट साठी 1630 रुपये मोजावे लागणार आहेत. तर वंदे भारत एक्सप्रेस दादर, ठाणे आणि नाशिकरोड येथे थांबेल. इगतपुरी ते पुणतांबा दरम्यान ही ट्रेन ताशी 110 किमी वेगाने धावेल. 


महत्वाच्या बातम्या


CSMTवर अवतरली अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेस; मुंबईहून पंढरपूर-सोलापूर रिटन एका दिवसात शक्य होणार- काय आहे खासियत