PM Modi Mumbai Visit Live Updates :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्स्प्रेसला दाखवला हिरवा झेंडा; सीएसएमटी ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी दरम्यान धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते आंतरराज्य प्रवास करणा-या मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे.

abp majha web team Last Updated: 10 Feb 2023 04:16 PM

पार्श्वभूमी

PM Modi Mumbai Visit Live Updates :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आंतरराज्य प्रवास करणा-या मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसला...More

PM Narendra Modi : मुंबई आणि पुण्याला धार्मिक स्थळांशी वंदे भारत एक्स्प्रेस जोडेल : पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi : मुंबई आणि पुण्याला धार्मिक स्थळांशी वंदे भारत एक्स्प्रेस जोडेल. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे महाराष्ट्रात पर्यटन आणि तीर्थक्षेत्राला चालना मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यादरम्यान म्हणाले.