मुंबई : सांताक्रूझमधल्या वाकोला येथील हॅप्पी हाऊस वेल्फेअर सोसायटीच्या इमारतीला 55 वर्ष पूर्ण झाली आहेत. ही इमारत धोकादायक असून कधीही कोसळू शकते. त्यामुळे गेल्या महिन्यात डोंगरीत घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ती इमारत रिकामी करण्यात यावी, यासाठी पालिकेने नोटीस बजावली आहे. तसेच लोकांनी तिथून बाहेर पडावं यासाठी इमारतीचे पाणी आणि वीज जोडणी बंद केली आहे.
पालिकेने पाणी आणि वीज जोडणी बंदल केल्यानंतर त्याविरोधात हॅप्पी हाऊस वेल्फेअर सोसायटीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी पालिकेच्या वतीने बाजू मांडताना कोर्टाला सांगण्यात आले की या इमारतीच्या बाजूलाच एक शाळा आहे. इमारत कोसळून दुर्घटना घडल्यास शाळेच्या विद्यार्थ्यांनाही धोका आहे. त्यामुळे ही इमारत तात्काळ रिकामी करणे आवश्यक आहे.
सध्या धोकादायक इमारतीत 36 पैकी 10 कुटुंब अजूनही वास्तव्य करीत आहेत. इमारतीवर पालिकेने कारवाई करु नये म्हणून कनिष्ठ न्यायालयाकडून स्थगिती मिळवली होती. मात्र काही काळाने न्यायालयाने ही स्थगिती उठवली. त्यामुळे रहिवाशांनी पुन्हा कारवाईवर स्थगिती मिळावी म्हणून हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने अंतिम निकालासाठी ही सुनावणी शुक्रवार 2 ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे.
तुम्ही घराचे मालक, इमारतीचे नाही, धोकादायक इमारतीच्या सोसायटीची हायकोर्टाकडून कानउघडणी
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
01 Aug 2019 08:03 PM (IST)
सांताक्रूझमधल्या वाकोला येथील हॅप्पी हाऊस वेल्फेअर सोसायटीच्या इमारतीला 55 वर्ष पूर्ण झाली आहेत. ही इमारत धोकादायक असून कधीही कोसळू शकते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -