मुंबई : यूपीएससी परीक्षेत चांगले गुण मिळवूनही, रेल्वेनं माझ्या क्षमतांवर अविश्वास दाखवल्याची खंत यूपीएससी परीक्षेतील टॉपर विद्यार्थीनी प्रांजल पाटीलनं व्यक्त केली. एबीपी माझा कट्टावर बोलताना तिने आपली नाराजी तिने व्यक्त केली.


प्रांजल म्हणाली की, ''मी शारिरीक विकलांग कोट्यातूनच यूपीएससी परीक्षा दिली होती. यात मला चांगलं यश मिळालं. पण या विभागात तुझ्यासाठी योग्य काम नसल्याचं सांगून, रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला. म्हणून मी रेल्वे सेवेतच काम करण्याचा अट्टाहास केला. ''

शिवाय, रेल्वेकडून दिव्यांगांसाठी कोटा असतानाही हा विभाग अशा तरुणांना रेल्वेच्या सेवेत सामावून घेत नसल्याचंही तिनं यावेळी सांगितलं. रेल्वेच्या या भूमिकेमुळे दिव्यांगांसाठी रेल्वे विभागाची काम करण्याची संधी मिळत नाही, असं म्हणाली.

यूपीएससी परीक्षेची तयारी करताना आलेल्या अनेक अडचणींबद्दलही तिने यावेळी सांगितलं. ''यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी दिव्यांगांना त्यासाठीचं शैक्षणिक साहित्य उपलब्ध होत नाही. तसेच ग्रंथालयातील पुस्तकांवर अनेक विद्यार्थी मार्किंग करत असल्याने, त्याचे कॉम्प्यूटरवर स्कॅन करताना आवश्यक भाग स्कॅन होत नाही. अशावेळी महत्त्वाचाच भाग वगळला जातो. तो बंद व्हावं यासाठी मी वैयक्ती पातळीवर प्रयत्न करत आहे,'' असं तिनं सांगितलं.

विश्वांजली गायकवाडनेही यूपीएससी तयारी विषयीचे अनुभव सांगितले. ''ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रतिकुल परिस्थितीही परीक्षेसाठी मेहनत घेतात. तर शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये कोणती कमतरता आहे, या जाणिवेतून यूपीएससीसाठी तयारी केली. यातून व्यक्तीमत्त्वात अनेक बदल घडले,'' असल्याचं तिनं यावेळी सांगितलं.