मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरचा जामीन रद्द करावी आणि लोकसभा निवडणूक लढण्याची परवानगी न देण्याबाबत मुंबईच्या विशेष एनआयए कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. साल 2008 च्या मालेगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये मुलगा गमावलेल्या नासिर बिलाल यांनी ही याचिका दाखल केली आहे. तसेच साध्वीला इतर आरोपींसह मुंबईतील एनआयए कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीसाठी नियमित हजेरी लावण्याचे निर्देश देण्याची मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे.


VIDEO | ...म्हणून साध्वी प्रज्ञाला उमेदवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्पष्टीकरण | एबीपी माझा


साध्वी प्रज्ञा सध्या जामीनावर बाहेर असून त्यांच्यावर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि इतर आरोपींविरोधात युएपीए कलमाखाली देशविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली खटला सुरू आहे. याप्रकरणी साध्वी आणि आरोपींनी दोषमुक्तीसाठी केलेल्या याचिकाही कोर्टात प्रलंबित आहेत.


कोर्टान जामीन मंजूर करताना खटल्याच्या नियमित सुनावणीला हजर राहण्याची अट घातलेली असतानाही सतत प्रकृती अस्वस्थ असल्याच्या कारणानं त्यांनी ही हजेरी टाळलेली आहे. मात्र सध्या साध्वी ज्या जोमात भोपाळमध्ये प्रचार करत आहेत ते पाहता त्यांची प्रकृतीही ठणठणीत असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.


नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या साध्वी प्रज्ञा यांनी भाजपनं प्रवेश केला आहे. आणि भाजपनं त्यांना थेट मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधून काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात उमेदवारी जाहीर केली आहे.


VIDEO | साध्वी प्रज्ञा सिंहांच्या उमेदवारीची मुख्यमंत्री फडणवीसांकडून पाठराखण | एबीपी माझा