मुंबईतील गोरेगावमध्ये तुफान तोडफोड, 60-70 रिक्षा फोडल्या
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 29 Aug 2016 08:44 AM (IST)
मुंबई : गोरेगावमधील नागरी निवारा भागात 60 ते 70 रिक्षा अज्ञातांनी फोडल्याची घटना घडली आहे. पार्किंगच्या वादातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, तोडफोडीचं ठोस कारण अद्याप कळू शकलेलं नाही. नागरी निवारा भागात रोज 150-200 रिक्षा पार्क होतात. मात्र, पार्किंगचे पैसे कुणी दिले नसल्याच्या कारणावरुन तोडफोड झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. दरम्यान, या तोडफोड प्रकरणी दिंडोशी भागातून एकाला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.