मुंबई  : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते संदीप देशपांडे आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जैन पर्युषण काळात देवनार कत्तल खाना तसंच मांस विक्रीवर बंदी घालण्याच्या विरोधात मनसेचं दादरमधील आगार बाजार इथे आंदोलन सुरु होतं. त्यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली.

 

जैन पर्युषण काळात देवनार कत्तल खाना किती दिवस बंद ठेवावा यावरुन वाद असतो. यंदा मुंबई महापालिकेने 29 ऑगस्ट णि 5 सप्टेंबर या दोन दिवसात बंदीचा निर्णय घेतला आहे. परंतु या काळात मांसविक्रीलाही बंदी घातल्याचं परिपत्रक राज्य सरकारने जारी केल्याचा आक्षेप नोंदवत मनसेने आगार बाजार इथे आंदोलन केलं.

 

यावेळी पोलिसांनी संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.