Maharashtra Government VS Governor : मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंचा शोध सुरू झाला आहे. कुलगुरु पदासाठी शोध समिती नियुक्तीसाठी राजभवनाकडून सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. याच महिन्यात ठरणार कुलगुरू नियुक्ती समितीचे सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर, याच मुद्यावरून राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. विधीमंडळाने विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर केले होते. यानुसार कुलगुरू निवडीचे अधिकारी राज्य सरकारकडे येणार होते. मात्र, राज्यपालांनी या विधेयकावर स्वाक्षरी केलीच नसल्याची माहिती समोर आली आहे. 


मुंबई विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंचा शोध राज्यपाल कार्यालयाने सुरू केला आहे. नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी शोध समिती तयार केली जात आहे. या समितीमध्ये व्यवस्थापन परिषद आणि विद्वत परिषद यांचे नामनिर्देशित सदस्य कोण असावेत यासाठी एक संयुक्त बैठक या महिन्यात होणार आहे. मुंबई विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची एप्रिल 2018 मध्ये नियुक्ती झाली होती. त्यांच्या वयाची 65 वर्ष पूर्ण होत असल्याने साडेचार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर ते निवृत्त होत आहेत.  त्यामुळे कुलगुरू निवडीसाठी जुन्याच पद्धतीने कुलगुरू निवडले जाणार असल्याची माहिती आहे


राज्यपाल आणि राज्य सरकार संघर्षाची ठिणगी?


महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 मध्ये बदल करण्यात आला असून कायदा मंजूर झाला आहे. मात्र, तरीदेखील राजभवनाच्या पत्रानंतर जुन्या पद्धतीने कुलगुरू निवडले जाणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 सुधारणा विधेयकाला दोन्ही सभागृहात तीन महिन्यांपूर्वी मंजुरी मिळाली असली तरी राज्यपालांनी अद्याप याबाबत कोणतीही ही मंजुरी दिली नाही किंवा कसलीही प्रतिक्रिया दिली नाही.
त्यामुळे विधेयक जरी मंजूर झाला असला तरी कुलगुरूंची निवड मात्र जुन्याच पद्धतीने होणार असल्याचे चित्र आहे.


याआधीपासून राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष पेटला असल्याचे चित्र आहे. राज्यपालांनी अद्यापही विधान परिषदेच्या नामनिर्देशित 12 सदस्यांसाठीच्या नावाच्या यादीवर कोणताही निर्णय घेतला नाही. त्याशिवाय इतरही मुद्यांवरून राज्यपाल आणि राज्य सरकार आमनेसामने उभे ठाकले आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI