मुंबई : आज मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली. दर वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा अनेक मुंबईतील नामांकित कॉलेजचा कट ऑफ हा नव्वदीपार पाहायला मिळतोय. नामांकित महाविद्यालयांची कला शाखेची गुणवत्ता यादी नव्वदीपार तर काही ठिकाणी 95 टक्क्यांच्यावर आहे. कला शाखेप्रमाणेच वाणिज्य व विज्ञान शाखेपेक्षा विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे सेल्फ फायनान्स (स्वयं अर्थसहाय्यित)अभ्यासक्रमांना आपली पसंती विद्यार्थ्यांनी यंदाही दर्शविली आहे. बीएमएस, बीएमएम , बायोटेक्नॉलिजी, बीएस्सी आयटी या अभ्यासक्रमांना पदवी प्रवेशासाठी प्राधान्य दिले आहे. यंदा बारावीच्या वाढलेल्या निकाल वाढला असला तरी नव्वद टक्के मिळवूनही विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयासाठी दुसऱ्या गुणवत्ता यादीची वाट पहावी लागणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे पहिल्या गुणवत्ता यादीत आपलं नाव आहे, अशा विद्यार्थ्यांनी 11 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत आपलं नाव निश्चित करताना अॅडमिशन फॉर्म, फी, विद्यार्थ्यांनी कागदपत्रांच्या मुळ प्रती आणि हमी पत्र (अंडरटेकिंग ) महाविद्यालयात सबमिट करणे गरजेचे आहे. तर दुसरी गुणवत्ता यादी ही 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता जाहीर केली जाणार आहे.
बीबीआय (बॅचलर इन बँकिंग अँड इन्शुरन्स), बीएएफ (बॅचलर इन अकाऊंटिंग अँड फायनान्स), बीएफएम (बॅचलर इन फायनान्स मार्केट) यांसारखे अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांची पसंती मिळवत आहेत. पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा या अभ्यासक्रमांमुळे व्यावसायभिमुख प्रशिक्षण मिळत असल्याने त्यांच्याकडे ओढा वाढत आहे. नामांकित महाविद्यालयांच्या पारंपरिक आणि सेल्फ फायनान्स कोर्सेसचा कट ऑफ नव्वदीपार गेल्याने ८० ते ८५ टक्क्यांहुन अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना आता दुसऱ्या गुणवत्ता यादीची वाट पाहावी लागणार आहे.
महाविद्यालयांनी हमीपत्राच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे तात्पुरते प्रवेश निश्चित करून केल्यावर अंतिम प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती टाळण्यासाठी महाविद्यालयांनी ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आपला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातील महाविद्यालयांना प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येत असल्यास व प्रतिबंधित क्षेत्रात मोडत नसल्यास सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करून ऑफलाईन प्रक्रिया राबवू शकतात. वेळोवेळी स्थानिक जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे योग्य ते पालन करण्याच्याही सूचना विद्यापीठामार्फत देण्यात आल्या आहेत. जर एखाद्या विद्यार्थ्यास प्रवेशासाठीच्या तांत्रिक सुविधेसाठी अडचणी आल्यास त्यांने त्याच्या नजीकच्या महाविद्यालयाशी संपर्क साधला जाऊ शकणार आहे.
मुंबईतील नामांकित महाविद्यालयाचे कट ऑफ लिस्ट
जय हिंद कॉलेज
बी ए ( जनरल) प्रथम वर्ष - 95.67 %
बी कॉम प्रथम वर्ष - 91 %
बी ए एफ प्रथम वर्ष - 94 %
बी बी आय प्रथम वर्ष -91.2 टक्के
बी एफ एम - 94.60 टक्के
बी एम एम (कॉमर्स )- 96.20 %
बी एम एम ( सायन्स ) -93.4%
बीएम एम ( आर्टस् ) - 92 %
रुईया कॉलेज
बीए प्रथम वर्ष - 95.6 %
बी एस सी - 87.08 %
बी एस सी (कम्युटर सायन्स )- 86 %
बी एससी बायो टेक्नॉलॉजी - 94.02 %
झेवीयर्स कॉलेज
बी एम एस प्रथम वर्ष - 92.87 %
बी एम एम जी जे (पूर्वीचे बीएमएम ) - 86.80 %
बी एस्सी आय टी - 94 %
बी ए प्रथम वर्ष - 92 %
बी एस्सी -78.92 %
मिठीबाई कॉलेज
बीएमएस आर्टस् - 90.31%
बीएमएस कॉमर्स-95.60%
बीएमएस सायन्स - 91.50%
बीएमएम आर्टस् -95 %
बीएमएम कॉमर्स - 93.80%
बीएमएस सायन्स - 91.60%
बीएएफ प्रथम वर्ष - 95%
बीबीआय प्रथम वर्ष - 89.33 %
बीएफएम प्रथम वर्ष - 94.20%
बी ए प्रथम वर्ष - 96%
बी कॉम प्रथम वर्ष - 91.40%
बी एस्सी (कम्प्युटर सायन्स )प्रथम वर्ष - 84.40 %
बी एससी बायोटेक्नॉलॉजी -88.60%
नरसी मुंजी कॉलेज
बी कॉम - 94.33%
बीएएफ - 96.2%
बीएफएम-95.2%
बीएस्सी आयटी -81%
बीएमएस सायन्स 91.08 %
बीएमएम आर्टस् -93.08%
बीएमएम -96.02 %
विल्सन कॉलेज कट ऑफ
बीएमएम आर्टस् -92.4%
बीएमएम कॉमर्स -88.15%
बीएमएम सायन्स -88.25 %
बीएमएस आर्टस् -88.15 %
बीएमएस कॉमर्स - 92.33 %
बीएमएस सायन्स - 83.4%
बीएएफ - 88.46%
बी एस्सी आयटी -80%