मुंबई : सीएसटी स्टेशनवर उद्यान एक्स्प्रेसचा डबा घसरल्यानं आज मध्य रेल्वेवरच्या ट्रेन्सचं वेळापत्रक कोलमडलं आहे. पुण्याहून मुंबईला येणारी डेक्कन क्वीन गाडी तब्बल तीन तासांपासून अंबरनाथ स्टेशनवर रखडलेली आहे.
ट्रेन्सच्या खोळंब्यामुळे हजारो चाकरमान्यांचे हाल सुरु आहेत. डेक्कन क्वीन या गाडीनं अनेक नोकरदार मंडळी, व्यापारी तसेच शाळा कॉलेजचे विद्यार्थी प्रवास करतात. त्या सर्वांना आज प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय.
सीएसटी-लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस 1 तास उशिरानं, सीएसटी-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस पाऊण तास उशिरानं धावत आहेत. नागरकोईल एक्स्प्रेस आणि चेन्नई एक्स्प्रेस या ट्रेन दादरवरुन सोडण्यात येतील, तर पुण्यावरुन येणाऱ्या गाड्यांचा अंतिम स्टॉप दादर असेल.