मुंबई : शिवसेना भाजप युतीला सध्यातरी ब्रेक लागल्याचं दिसतं आहे. याचं कारण भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तूर्तास नकार दिल्याचं कळतं आहे. यामुळे युतीची चर्चा सध्या तरी लांबणीवर पडल्याचं दिसतं आहे.


अहमदनगरमध्ये शिवसैनिकांचं झालेलं दुहेरी हत्यांकाड, नाणार प्रकल्पाला वाढता विरोध यामुळे युतीच्या चर्चेला खीळ बसल्याचं कळतं आहे. कालच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी  'भाजपने आमचा मुका घेतला तरी, आता युती होणार नाही,' असं वक्तव्य केलं होतं.

आगामी सर्व निवडणुका शिवेसना स्वबळावर लढणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मेळाव्यातूनच जाहीर केलं होतं. त्यामुळे सेना-भाजप युतीवर प्रश्नचिन्ह कायम आहे.

संबंधित बातम्या :

सुधीर मुनगंटीवारांनी मागितली उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ