मनसेच्या प्रस्तावाबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील : राऊत
एबीपी माझा वेब टीम | 28 Jan 2017 11:57 AM (IST)
मुंबई : मनसेच्या प्रस्तावाबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं सूचक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत गोव्यात बोलत होते. शिवसेना आणि भाजप युती तुटल्यानंतर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेने शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.