मुंबई :  पाच राज्यांचा निकाल लागला या निवडणुकीत (Election Result)  भाजपाला (BJP)  घवघवीत यश मिळाले. आता पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या दम असेल तर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची (BMC)  निवडणूक घ्या आणि एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)  भाजपला खुले आवाहन दिले आहे. तुमच्यात आत्मविश्वास असेल तर लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा असे देखील ते या वेळी म्हणाले. सरकारला आणि अदानीला जाब विचारण्यासाठी 16 डिसेंबर धारवीहून अडाणीच्या कार्यालायवर शिवसेनेचा मोर्चा काढण्यात येणार  असल्याची माहिती  उद्धव ठाकरेंनी दिली आहे. 


उद्धव ठाकरे म्हणाले,  धारावीमध्ये राहणाऱ्या लोकांचे त्यांच्या उद्योगासाठी तिथेच स्थानांतर होणे गरजेच आहे 400 ते 500 फुटांची जागा मिळायला हवी. 80 ते 90 हजार झोपड्या अद्याप पात्र अपात्रतेच्या सीमेवर आहे.  मला अडाणी यांना विचारायचं आहे की तुम्ही काय करणार आहात. सरकार उद्योगपतीला मदत करत आहेत. पिढ्यान् पिढ्या धारावीवासीय राहत आहेत त्या ठिकाणीं धारावी वासियांना राहायला मिळायला हवं यासोबतच पोलीस सफाई कर्मचारी यांना देखील राहायला संधी मिळायला हवी.  टीडीआर सक्ती करणार असाल यत मग त्याचे सरकारला अधिकार का देता? सरकारने ते आपल्याकडे घ्यायला हवं. अडाणी यांचं भल कसं होईल असा सरकारने प्लॅन केला आहे. जर टीडीआर हा विषय समोर येणार असेल तर सरकारने ते आपल्या ताब्यांत घ्यायला हवं. कुठेही सर्व्हे करताना दडपशाही झाली तर शिवसैनिक हे हाणून पाडेल.  20 टक्के सरकार आणि 80 टक्के अदानी असा विषय सध्या झाला आहे.  याबाबत देखील खुलासा व्हायला हवं. 


16 तारखेला अदानींच्या ऑफिसवर भव्य मोर्चा : उद्धव ठाकरे


धारावीचा विकास झालाच पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. धारावीचे विकासांच्या कामाबाबात संशय येत आहे. धारावीच्या गलिच्छ वस्तीला सोन्याचा भाव आला. तेथील व्यवसायिकांना देखील जागा मिळाल्या पाहिजे.  विकास कामांमुळे मुंबईकरांचा श्वास घुसमटला आहे. नियोगन शून्य कामामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.  सरकार केवळ कंत्राट काढत आहे. हे कॉन्ट्रॅक्ट सरकार आहे. अभ्युदय नगर बांद्रा रिक्लेमेशन हे देखील अदानीलां देण्यात येणार आहे अशी माहिती मिळली  आहे.  केवळ अदानी साठी सगळं करत आहेत त्यामुळेच 16 तारखेला भव्य मोर्चा अदानीचा ऑफिसवर काढण्यात येईल. मुंबईला संपवण्याचे  काम कोणी करू नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले.  


मुंबईला काय उकिरडा करणार आहे का? : उद्धव ठाकरे


वीज बिलाचे कंत्राट देखील अदानीला देण्यात आलं आहे. याचा आता सोक्षमोक्ष लावायचा आहे. सगळं अदानीला कसं काय? आहे. सगळे उद्योग गुजरातला घेऊन जात आहात मग मुंबईला काय उकिरडा करणार आहात का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला  आहे.  पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घ्या आणि एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या. तुमच्यात आत्मविश्वास असेल तर लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला केला आहे.