मुंबई : आज अखेर बाळासाहेबांचं (Balasaheb Thackeray)  स्वप्न पूर्ण झालं. रामजन्मभूमीसाठी प्राणांची बाजी लावलेल्या शिवसैनिक कारसेवकांचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया  प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सोशल मीडियावर दिली आहे.  अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)  निमंत्रण मिळाले. मात्र उद्धव ठाकरे आज नाशिकमधील काळाराम मंदिरात (Kalaram Mandir)  श्रीरामाचे पूजन करणार आहेत.


अखेर बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. रामजन्मभूमीसाठी प्राणांची बाजी लावलेल्या शिवसैनिक कारसेवकांचा अभिमान आहे. प्रभूश्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रामभक्तांना मंगलमय शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने  एक्स (पूर्वीचे ट्वीटर)  माध्यमावर दिली आहे. 






शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं स्वप्नं आज पूर्ण झालं, सर्व कारसेवकांनी केलेल्या त्यागाचं आणि बलिदानाचं सोनं झालं!  प्रभू श्रीरामचंद्रांचा विजय असो! जय सिया राम!






अयोध्येत राम मंदिर (Ram Mandir) अभिषेक सोहळा पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आनंद व्यक्त केला आहे. राज यांनी ट्विट करून सोहळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज यांनी ट्विट करत आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि 32 वर्षांनी शरयू नदी हसली, जय श्रीराम! असे म्हटले आहे. 


भारतवर्षाची प्रदीर्घ काळाची प्रतीक्षा


 अवघ्या भारतवर्षाची प्रदीर्घ काळाची प्रतीक्षा अखेर संपली... अयोध्येत राममंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाले. हिंदू संस्कृतीनुसार सूर्य म्हणजे डोळे, वायू म्हणजे कान आणि चंद्र म्हणजे मन... या तिन्ही देवतांना विनंती करत, अग्नि यज्ञाच्या साक्षीने अखंड मंत्रघोषात प्रभू श्रीरामाचे गाभाऱ्यात विधिवत पूजन करण्यात आलं. प्रभाते मनी राम चिंतीत जावा।, पुढे वैखरी राम आधी वदावा॥ श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या या श्लोकाची खरीखुरी सात्विक  प्रचिती सध्या अखंड भारत भूमी घेत आहे.


हे ही वाचा :


Ram Mandir : देव ते देश आणि राम ते राष्ट्राच्या चेतनेचा प्रवास, राम ही आग नाही, उर्जा आहे; नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा मुद्दे