मुंबई : महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांवर नवीन जबाबदारी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांवर ओएसडी म्हणजे विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती होऊ शकते.

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांनी आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक म्हणून जवाबदारी उत्तम रित्या पार पाडली आहे. त्यामुळे आता नार्वेकरांना नवीन जबाबदारी मिळाल्यास ते किती उत्तम रित्या हाताळतील याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

'मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं म्हणत छत्रपती शिवराय आणि माता-पित्यांना वंदन करुन उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तमाम जनतेला वंदन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

Milind Narvekar | मिलिंद नार्वेकरांवर नवीन जबाबदारी पडण्याची शक्यता | ABP Majha



कोण आहेत मिलिंद नार्वेकर?

मिलिंद नार्वेकर हे एक शिवसैनिक होते. मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसनेच्या गटप्रमुख पदाचं काम पाहायचे. 1992च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या परिसरातील वॉर्ड विभागला गेला. नव्या वॉर्डचं शाखाप्रमुखपद मिळेल या आशेने नार्वेकरांनी मातोश्री गाठली. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले मिलिंद नार्वेकर हे शाखाप्रमुख होण्यासाठी मुलाखत देण्याकरिता उद्धव यांना पहिल्यांदा भेटले.

हुशार, स्मार्ट, बोलण्यात पटाईत असा नार्वेकरांमधील चमक पाहून उद्धव ठाकरेंनी त्यांना फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे. मिलिंद नार्वेकरांना पटकन उत्तर दिलं तुम्ही सांगाल ते. तेव्हापासून नार्वेकर हे सावलीसारखे उद्धव यांच्यासोबत आहेत. साधारण 1994 सालच्या उत्तरार्धात मिलिंद नार्वेकर रितसर उद्धव ठाकरे यांचे पीए बनले. संघटनेत महत्त्वाची पदे उद्धव यांच्या विश्वासू व्यक्तींकडे जातील, हे पाहण्यापासून ते राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार होईपर्यंतच्या अनेक घटनांमध्ये त्यांचा आत्तापर्यंत मोठा वाटा राहिला आहे.

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शपथविधी, सासूबाई माधवी पाटणकर यांना काय वाटतं? | ABP Majha