मुंबई: आयुक्त तुकाराम मुंढेंची नवी मुंबईतून उचलबांगडी करण्यासाठी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची तयारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दाखवली आहे. तुकाराम मुंढे प्रकरणावर चर्चा करण्यासाठी, भाजप वगळता नवी मुंबईच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली.
नवी मुंबई महानगरपालिकेत अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतरही, मुख्यमंत्र्यांकडून तुकाराम मुंढेंना अभय देण्यात येत असल्याची माहिती समोर येते आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.
मातोश्रीवर झालेल्या या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर ठेवा अन्यथा कायदा बदला असं आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे.
संबंधित बातम्या:
नवी मुंबईचे महापौर 'मातोश्री'वर
नवी मुंबईचे महापौर राजीनामा देणार?
'तुकाराम मुंढेंचा स्वभाव अहंकारी'
'डॉन' तुकाराम मुंंढेंसाठी ईरेला पेटू नका, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
आयुक्त तुकाराम मुंढेंची तात्काळ बदली होणार नाही: सूत्र
नवी मुंबई मनपा आयुक्त तुकाराम मुंढे मंत्रालयात
रिझल्ट देणं माझं काम : तुकाराम मुंढे