मुंबई: नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे 'मातोश्री'वर दाखल झाले आहेत. नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबाबत चर्चा करण्यासाठी सुधाकर सोनवणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत.


यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यांसह सेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत.

नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं. तर भाजपने तुकाराम मुंढेंच्या बाजूने मतदान केलं होतं.

मात्र तरीही आयुक्त तुकाराम मुंढे महापालिकेत नियमित येत आहेत. त्यामुळे महापौरांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. महापौर सुधाकर सोनवणे यांनी त्यांना पत्र लिहून कामकाज न करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी पोलीस स्टेशनमध्येही धाव घेतली होती.

संबंधित बातम्या

'तुकाराम मुंढेंचा स्वभाव अहंकारी'

नवी मुंबईचे महापौर राजीनामा देणार?

आयुक्त तुकाराम मुंढेंची तात्काळ बदली होणार नाही: सूत्र

रिझल्ट देणं माझं काम : तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढेंच्या Exclusive मुलाखतीतील 10 मुद्दे


आयुक्त तुकाराम मुंढेविरोधात अविश्वास ठराव मंजूर

आरोपांबाबत मला बोलण्याची संधीच मिळाली नाहीः तुकाराम मुंढे

राष्ट्रवादी काँग्रेसने हाकलेले कर्तव्यनिष्ठ आयएएस अधिकारी