मुंबई: ‘मुंबईतले नालेसफाईची कामं कधीच पूर्ण होऊ शकत नाही,’ असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे. तसचं नालेसफाईवरुन यंदाही झालेले घोटाळ्याचे आरोपही उद्धव ठाकरेंनी फेटाळले आहेत.

'नालेसफाई कधीच पूर्ण होत नसते. नालेसफाई पावसाच्या आधी पावसानंतर पुन्हा चालूच असते. त्यांच्यामुळे नालेसफाई पूर्ण हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. ही सातत्याने चालू असणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे पावसाच्या पूर्वी जी कामं करायची आहेत तू पूर्ण केली जातील.' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘गेल्या वर्षी मुंबईत पाणी तुंबल नाही. या वर्षी देखील पाणी तुंबणार नाही. याबद्दल मुंबईकरांना आश्वस्त करतो. जवळपास गेली वर्षे मी नालेसफाईची पहाणी मी करतो. दरवेळा मला प्रश्नं विचारला जातो की निवडणुकीच्या तोंडावर नालेसफाईची पहाणी करता का? आता निवडणुका तर होऊन गेलेल्या आहेत. माझं कर्तव्य म्हणून मी ही पहाणी करतो. ही पहाणी करताना अनेक ठिकाणी सुधारणा झालेल्या आहेत. नाल्यांचं रुंदीकरण झालेलं आहे. यावर्षी नालेसफाईचं काम सुरू आहे. किती टक्के सफाई झाली या प्रश्नात मला इंटरेस्ट नाही. मुळात पाणी तुंबू न देणे याकडे महापालिकेचं लक्ष आहे. गेल्या वर्षी पाणी तुंबले नाही. यावेळी ही माहापालिका दक्ष आहे.’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महापौर विश्वनाथ महाडेश्वरांसोबत माहिम ते जोगेश्वरी दरम्यानच्या नाल्यांची उद्धव ठाकरेंनी पाहणी केली. कंत्राटदारांकडून नाल्यांमध्ये डेब्रिज ओतलं जातं. तेच डेब्रिज नंतर उपसून खोटा गाळ काढला जात असल्याचा आरोप होतो आहे.

VIDEO: