डोंबिवली : घर दुरुस्तीच्या वादातून डोंबिवलीत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास डोंबिवलीच्या चोळे गावात ही घटना घडली.
किशोर चौधरी यांनी देवी शिवामृत सोसायटीतील घराच्या दुरूस्तीचं काम घेतलं होतं. यावरून दोन दिवसांपूर्वी त्यांचा दिलीप भोईर नावाच्या व्यक्तीशी वाद झाला होता.
मात्र आज सकाळी (मंगवार) किशोर चौधरी घराची दुरुस्ती करत होते. त्यावेळी दिलीप भोईर, चिराग भोईर, सुरज भोईर, शंकर भोईर आणि परेश अंदाले तिथं आले आणि त्यांनी किशोर चौधरींच्या डोक्यात तब्बल 12 गोळ्या झाडल्या.
यातच किशोर चौधरी यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले नितीन जोशी हे जखमी झाले. सध्या सर्व आरोपी फरार असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.