उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
एबीपी माझा वेब टीम | 21 Nov 2016 03:47 PM (IST)
मुंबई: मोकळी जागा दिसली की परवडणारी घरं असा शब्द वापरतात, पण ही घरं नेमकी कुणाला परवडतात. परवडणारी घरं ही शब्दांची चालखी आहे. असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं कुलाबा इथं मलनिःसारण प्रकल्पाचं भूमिपूजन झालं. त्यावेळी उद्धव टाकरे बोलत होते. बाजारात सध्या नोटांची चणचण भासतेय, मात्र तशी मुंबईत कधी पाण्याची चणचण भासली का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला. रेसकोर्सवरची सव्वा दोनशे एकर जमीन सर्व सामान्य लोकांसाठी मोकळे मैदान म्हणून मिळाली पाहिजे. शिवाय पूर्व किनारपट्टीची 900 एकर जमीनही सामान्य मुंबईकरांना मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.