मुंबई : असंवैधानिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दावोसला जवळजवळ 50 लोकांना घेऊन जाणार आहेत यामध्ये अधिकारी, कर्मचारी आदींचा समावेश आहे. मागचा दौरा त्यांनी केला तेव्हा 28 तासात 40 कोटी रुपये खर्च केले होते.  आधी 50 खोके होते आता हे 50  लोकं घेऊन जात आहे  असं म्हणत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली आहे. ते मुंबईत (Mumbai News) पत्रकार परिषदेत बोलत होते. वऱ्हाड निघाले लंडनला तसं हे वऱ्हाड निघाले दाओसला असा टोला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. 


 सध्याचे खासदार, माजी खासदार, खासगी एजन्सींचे काही प्रचारक, सीएम आणि डीसीएमला पीएची संपूर्णटीम, मुख्यमंत्र्याचे ओएसडी यांचा समावेश आहे.या शिष्टमंडळात कोणीही बिझनेसमॅन नाहीत. येथे 50 लोक काय करतील? तिथं फक्त सामंजस्य करारांवर मुख्यमंत्री स्वाक्षरी करतील, सामंजस्य करारावर फक्त सरकारचे प्रमुख आणि संबंधित अधिकारी आवश्यक आहेत. इतके मोठे राष्ट्रीय शिष्टमंडळ कशाला? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.


केंद्र सरकारचा अंकुश आहे की नाही?


जेव्हा तुम्ही असा दौरा करतात तेव्हा वित्त विभाग आणि परराष्ट्र  मंत्रालयकडून परवानगी लागते. आता या दौऱ्यात 10 लोकांची परवानगी दिली आहे अशी माहिती आहे. त्यात आता इतर लोकांची परवानगी या केंद्रीय मंत्रालयाने दिली आहे का? या दौऱ्यात मुख्यमंत्री यांच्यासोबत उदयोग मंत्री, खासदार, माजी खासदार सुद्धा आहेत. ज्यांना गुवाहाटी नेलं नाही त्यांना वाटतं घेऊन जाताय, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे म्हणाले.  MSRDC चे अधिकारी, ओएसडी चालले आहेत. उपमुख्यमंत्री यांचे  OSD सुद्धा आहेत. एवढ्या लोकांची यादी तुम्ही पाहिलं तर तुम्हाला धक्का बसेल. केंद्र सरकारचा अंकुश आहे की नाही? यामध्ये काही दलाल सुद्धा आहेत अशी माहिती आहे. 


एवढे लोक का घेऊन जाताय?


दावोसला जिथे 5-6  लोकांचे काम आहे.  तिथे एवढे लोक का घेऊन जाताय? बॅग उचलायला असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. या 50 लोकात कोणीही बिझनेस मॅन नाही.  हा खर्च जरी स्वतः ते करणार असले तरी MEA ला हे माहिती आहे का? मी MEA ला हेच विचारतोय की हे तुम्हाला माहिती आहे का? आणि तुम्ही इतक्या लोकांना परवानगी दिली आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी सवाल केला आहे.  


महाराष्ट्र सरकारचा पैसा यामध्ये जातोय : आदित्य ठाकरे


दाओसला तीन ते चार दलाल मित्र आहेत त्यांना सुद्धा सोबत घेऊन जाता आहेत. मुख्यमंत्री बायोकाला घेऊन जाऊ शकतात.  येथे मुलांना सुद्धा घेऊन जाता आहे.सही मुख्यमंत्री करणार आहेत मग एवढ्या लोकांची गरज आहे का? महाराष्ट्र सरकारचा पैसा यामध्ये जातोय म्हणजे आपला सगळ्यांचे पैसे जात आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.  


 



हे ही वाचा :


CM Eknath Shinde : खासदार मुलगा श्रीकांत शिंदेंच्या घराणेशाहीवर सीएम शिंदे म्हणतात, पक्षाला तेव्हा तरुण, उच्चशिक्षित चेहरा हवा होता