मुंबई : मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहणारं 'व्हिजन' सहन करणार नाही, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. भाजपचे विकासाचे 'व्हिजन' मान्य असेल, तर मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात म्हणाले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले.


"माझ्या मुंबईकडे जर वाकड्या नजरेने पाहाल, तर 'व्हिजन' मी अजिबात सहन करणार नाही. तुमची व्हिजन तुमच्याकडे, पण मुंबईवरचा महाराष्ट्राचा ठसा पुसणारी जर तुमची व्हिजन असेल तर ती व्हिजन कोणाचीही असू दे, ते डोळे आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही

"गेली 25 वर्षे शिवसेनेबरोबर राहिल्यावर शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला. मात्र, शिवसेना आग आहे, आगीशी खेळ केला तर जळून खाक व्हाल", असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी शिवसेनेमुळेच मुंबई सुरक्षित असल्याचे म्हटलं.