मुंबई : तिसऱ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान पार पडलं. नांदेड जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींसाठी आज मतदान झालं. तर औरंगाबादमध्येही 4 नगरपालिकांसाठी आज मतदान झालं. भंडारा जिल्ह्यात चार नगरपालिका आणि गडचिरोली जिल्ह्यातील दोन नगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.


दुपारी साडेतीन वाजेपर्यंपत नांदेड जिल्ह्यात 57 , औरंगाबाद जिल्ह्यात 59 टक्के, भंडारा जिल्ह्यात 48 टक्के आणि गडचिरोली जिल्ह्यात 54 टक्के मतदान झालंय.

औरंगाबाद :

औरंगाबाद जिल्यात आज चार नगरपालिकांसाठी मतदान होणार आहे.

  • पैठण नगरपालिका

  • कन्नड नगरपालिका

  • खुलताबाद नगरपालिका

  • गंगापूर नगरपालिका


नांदेड :

नांदेड जिल्ह्यात 9 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे.

  • हदगाव नगरपालिका

  • कंधार नगरपालिका

  • धर्माबाद नगरपालिका

  • बिलोली नगरपालिका

  • देगलूर नगरपालिका

  • मुखेड नगरपालिका

  • उमरी नगरपालिका

  • कुंडलवाडी नगरपालिका

  • मुदखेड नगरपालिका

  • माहूर नगरपंचायत

  • अर्धापूर नगरपंचायत


गडचिरोली :

गडचिरोली जिल्ह्यातील दोन नगरपालिकेच्या निवडणुका आज होणार आहेत.

  • गडचिरोली नगरपालिका

  • देसाईगंज नगरपालिका


भंडारा :

भंडारा जिल्ह्यातील चार नगरपालिकांसाठी आज मतदान होणार आहे.

  • भंडारा

  • तुमसर

  • पवनी

  • साकोली