ठाणे : नोटाबंदीच्या डेडलाईन हुकल्या, मग युतीच्या चर्चेस डेडलाईन का?, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे. तसंच युतीबाबत अद्याप ठोस प्रस्ताव आलेला नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. ठाणे महापालिकेत सत्तेत आल्यावर कोणती कामं करणार आहोत, याची माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.
युतीच्या डेडलाईनबाबत पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारलं असता, ते म्हणाले, “अशा अनेक डेडलाईन झाल्या. नोटाबंदीच्या डेडलाईनचं काय झालं ते सांगा?”
युतीचा प्रस्ताव अद्याप आमच्याकडे आलेला नाही. प्रस्ताव आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं.
महापालिका निवडणुकीत युती करण्यासंदर्भात शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या फेऱ्या होत आहेत. आतापर्यंत तीन बैठका पार पडल्या. मात्र, अद्याप कोणतीही ठाम भूमिका समोर येत नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांची नेमकी भूमिका काय, हे जनतेलाही कळत नाही. त्यात आज उद्धव ठाकरे यांनी युतीबाबतच्या प्रश्नावर बोलण्यास टाळल्याचं दिसून आले.
संबंधित बातमी :
शिवसेनेकडून मुंबई आणि ठाणेकरांसाठी घोषणांचा पाऊस
शिवसेनेच्या प्रस्तावानं भाजप नेते संतापले, बैठकीतच सेना नेत्यांना सुनावलं!
पाहुण्याला जेवायला ताट द्यावे, पण स्वत:चा बसायचा पाट देऊ नये: गोऱ्हे
युतीच्या तिसऱ्या बैठकीत नेमकं काय झालं?
युतीची बोलणी फिस्कटली, शिवसेनेकडून भाजपला 60 जागांचा प्रस्ताव
रामदास कदम यांची शेलार आणि सोमय्या यांच्यावर खालच्या शब्दात टीका
एबीपी माझा सर्व्हेचा निकाल: युतीबाबत मुंबईकरांना काय वाटतं
शिवसेना-भाजपची युतीसंदर्भातील तिसरी बैठक, वेळ आणि ठिकाण ठरलं!
एबीपी माझा सर्व्हे : मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजप युती व्हावी का?
मुंबई महापालिकेसाठी भाजपची 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी तयार
शिवसेनेला आताच उपरती का? तावडेंचा सवाल