ठाणे: ‘धनुष्य बाणावर बटन दाबाच पण दिवा लागतो का तपासून पाहा. कारण सगळे थापाडे आहेत, काय करतील सांगता येत नाही. शिवसेनासोबत नसती तर स्वप्नात तरी खुर्ची बघितली होती का?’ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली.
‘मुख्यमंत्र्यांनी तमाम पोलीस स्टेशनमधल्या गुंडांची यादी मागवली, म्हणून पोलीस सुखावले. पण या सगळ्या गुंडांना उचलून त्यांनी भाजपात टाकले. माझे शिवसैनिक काय पप्पू कलानी सारखे गुंड आहेत? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
‘मला वाटत नाही भाजपने ठाण्यात कधी प्रचार केला असेल’
‘मला वाटत नाही कधी भाजपने ठाण्यात प्रचार केला असेल. आपला महापौर आला की यांचा उपमहापौर आलाच. सगळं आयतं मिळतंय मग मेहनत करायची कशाला?’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. ठाण्यातील प्रचार सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.
‘शिवसेनाप्रमुख असते तर काय बोलले असते विचार करा...’
‘देवेंद्रजी इथे येऊन बोट दाखवून सांगून गेले सगळं मीच केलं. शिवसेनाप्रमुख असते तर काय बोलले असते विचार करा. मुख्यमंत्री असं बोलतात जणू ठाण्याला जन्म यांनीच घातला. ठाणे आणि शिवसेना याची नाळ जोडलेली आहे. इथे उसळलेला जनसमुदाय भाड्याने आणलेला नाही. मुख्यमंत्री चौक सभा घेतायत आणि आम्हाला इशारे देतात.’ अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली.
‘मुख्यमंत्री तुमचा पारदर्शकपणा महाराष्ट्राला पण कळू द्या’
‘मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे माझं तुमचा सकाळपासून रात्रीपर्यंत काय कारभार करता, मंत्रालयात किती वेळ असता, किती फायलींवर सह्या करता हे पारदर्शकपणे कळू द्या महाराष्ट्राला. नुसते सकाळपासून रात्रीपर्यंत बोंबलत फिरता?’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
‘तुमच्या गुंडांनी माझ्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पहिलं तर…’
‘जर तुमच्या गुंडांनी माझ्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पहिलं तर माझा जाहीर इशारा आहे मुख्यमंत्र्यांना, माझी शिवसेना त्यांना ठोकून काढेल.’ अस म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या गुंड प्रवेशावर निशाणा साधला.
संबंधित बातम्या:
फडणवीस लवकरच माजी मुख्यमंत्री होतील : संजय राऊत
भाजपच्या बँकेत मतांची गुंतवणूक करा, 5 पट विकास परतावा देऊ: मुख्यमंत्री
‘आदित्य ठाकरे मुंबईसाठी अदखलपात्र’ : आशिष शेलार
जगात भ्रष्ट देशाचा पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंहांची ओळख होती : दानवे
‘टक्केवारीनं मुंबईचा घात केला’, पार्ल्यातील सभेत नितीन गडकरींचा आरोप
अमित शाहांची संपत्ती जाहीर, आता उद्धव ठाकरेंची करणार का? : माधव भांडारी
VIDEO : तो आहे देवेंद्र आमचा… भाजपचं कॅम्पेन साँग लाँच