दरम्यान, काल उद्धव ठाकरे यांचे 21 वर्षीय चिरंजीव तेजस ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेनेच्या विविध शाखांना भेटी दिल्या होत्या. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकांच्या प्रचारात तेजस ठाकरे उतरणार अशी चर्चा रंगली होती. याचविषयी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना विचारण्यात आलं.
यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मी बरोबर काम करतो की नाही ते पाहण्यासाठी आला होता.' असं त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं.
'तेजस काल माझ्याबरोबर सहजच आला होता, आदित्यही सोबत आहेच. पण तेजस सध्या कॉलेजमध्ये शिकतो आहे. त्यामुळे त्याचा राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही. सहजच वातावरण कसं आहे हे बघायला तो आला होता. त्याला राजकारणात यायचं असेल तेव्हा येईल. पण आता तरी तसा काही उद्देश नाही.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी तेजस सध्यातरी राजकारणात येणार नसल्याचं स्पष्ट केलं.
दरम्यान, तेजस ठाकरेंनी काही महिन्यांपूर्वी खेकड्याच्या काही प्रजाती शोधून काढल्या होत्या. यातील एका प्रजातीला ठाकरे कुटुंबीयांचं नाव देण्यात आलं आहे. ‘गुबेरनॅटोरिआना ठाकरी’ आणि इतर चार प्रजाती तेजसने सावंतवाडीजवळ शोधल्या होत्या.
संबंधित बातम्या