नालासोपाऱ्यात केलेल्या कारवाईत आयकर विभाग आणि पालघर गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत 1 कोटी रुपयांहून अधिक रोकड जप्त केली आहे. वसई विरार महापालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे आणि व्यापारी आनंद शेरेकर यांच्याकडून ही रक्कम ताब्यात घेण्यात आली.
जप्त केलेल्या नोटांमध्ये 45 लाखांच्या नव्या नोटा आहेत. तर 60 लाखा रुपये हे जुन्या 500च्या नोटांमध्ये असल्याची माहिती समजते आहे. यासंदर्भात नगरसेवक धनजंय गावडे आणि व्यापारी आनंद शेरेकरला ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरु आहे.
गुरुग्राममध्ये 40 लाखाची रोकड जप्त
दुसरीकडे गुरुग्राम-फरिदाबाद महामार्गावरील टोलनाक्यावर आयकर विभागानं 40 लाखाची रोकड जप्त केली आहे. यामध्ये 24 लाख 55 हजार 500च्या नव्या नोटो असून बाकिच्या या जुन्या पाचशे आणि दहा, वीसच्या नोटा आहेत. एका खासगी कंपनीच्या मारुती कारमधून हे पैसे पकडण्यात आले आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलीस आणि आयकर विभाग अधिक तपास करत आहे.