मुंबई: भाजपसोबतची युती तुटल्यानंतर, शिवसेना मोठा  आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येण्याची शक्यता आहे.

शिवसेना आणि मनसे यांच्यात युतीबाबत चर्चा सुरु आहे, अशी माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे.

विशेष म्हणजे, मनसेनं शिवसेनेसमोर जागांसाठी कुठलीही अट ठेवली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरेंची हातमिळवणी करणार की, स्वबळावर महापालिकेच्या आखाड्यात उतरणार हे पाहणं महत्वाचं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच भाजपसोबत युती तुटल्याची घोषणा करत, महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता मनसेने शिवसेनेकडे युतीसाठी हात पुढे केल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, दीड आठवड्यापूर्वी मनसेकडून शिवसेनेला तशा अशयाचा प्रस्ताव देण्यात आला होता अशी माहिती सू्त्रांकडून समजते. पण त्यावर शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने मनसेच्या आशा मावळल्या असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

संबंधित बातम्या
शिवसेना-भाजपची युती तुटली, महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढणार

युती तुटताच भाजपची शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी
शिवसेना-भाजपची युती तुटली, महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढणार

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर उद्धव ठाकरेंना फोन केला नाही: सूत्र

युती तुटताच भाजपची शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी



निवडणुकांची रणधुमाळी आजपासून, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

युतीच्या काडीमोडनंतर उमेदवारीसाठी सर्वपक्षीय मातोश्रीवर